समाजाचे अध:पतन रोखण्यासाठी साहित्यिक विद्वानांची समाजाला गरज – विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
  
समाजासमोरील आदर्श दिवसेंदिवस ढासळत चाललेले आहे. त्यामुळे वेगाने समाजाचे अध:पतन होतानांचे दुर्दैवी चित्र दिसत आहे याची खंत वाटते. समाजाला दिशा, क्रांती, आदर्श व विचार देण्याची ताकद फक्त साहित्यिक, विद्वान यांच्यात आहे. समाजाला ह्या काळात दिशादर्शनासाठी साहित्यिक व विद्वान यांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.
   
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने नाशिक शहरात आयोजित १० व्या राज्यस्तरीय निमंत्रितांचे कवी संमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून ना. झिरवाळ बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक मनपाचे गटनेते अरूण पवार, नगरसेवक सुरेश खेताडे ज्येष्ठ साहित्यिक,विचारवंत, कवी,अभिनेते डॉ. विठ्ठल शिंदे(, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब रोकडे, साहित्यिक कवी मिलिंद कसबे, महाराष्ट्र प्रदेश अ. भा. म. सा. प उपाध्यक्ष देविदास खडताळे, स्टार न्यूजचे विलास सुर्यवंशी, चेअरमन स्वर्गीय नामदेव परजने पाटील लॉ कॉलेज कोपरगावचे हिरालाल महानुभाव, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. आनंद अहिरे (उत्तर महाराष्ट्र प्रमुख अ.भा.म.सा.प.) व आयोजक नवनाथ गायकर ( जिल्हाध्यक्ष-अ. भा. म सा. प ) आदी मान्यवर उपस्थित होते.
  
आपल्या भाषणात पुढे बोलताना सामाजिक विसंगतीवर ना. झिरवाळ यांनी मार्मिक प्रहार केला. अ.भा.म.सा.प.च्या गाव तेथे वाचनालय या संकल्पनेचे स्वागत केले. या १० व्या निमंत्रीताच्यां कविसंमेलनाचे उदघाटन अरुण पवार यांचे हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. आनंद अहिरे यांनी सारस्वताचें स्वागत केले. आयोजक नवनाथ गायकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सलग दहा वर्षे साहित्य सोहळा राबवण्यामागची संकल्पना विशद करताना, साहित्यिकाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी नवनाथ गायकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक भावस्पर्श या कवितासंग्रहाचेही मान्यवरानी प्रकाशन केले. तर अ.भा.म.सा.प.नाशिक जिल्हा आयोजित पुस्तक स्पर्धा २०२० अतंर्गत प्रकाशित पुस्तक स्पर्धेतील सर्वोच्च विजेते प्रा. साईनाथ पाचरणे ( समिक्षा ), संजय धनगव्हाळ ( कविता संग्रह ), अमेय जाधव ( कादंबरी ), शुभांगी गादेगावकर ( बाल साहित्य।) व निला देवल ( कथासंग्रह ) आदींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले.

अ.भा.म.सा.प.नाशिक जिल्हा यांचे वतीने काव्य गौरव पुरस्कार २०२१ चे पुरस्कार माधवी पारख, अंबादास खोटरे, श्रीराम तोकडे, प्रदिप सरवदे, नवनाथ रणखांबे, कविता मोरवणकर, प्रतिभा जाधव, अविनाश ठाकूर, विनय पाटील व शांताराम वाघ आदीनां प्रदान करण्यात आला. पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन प्रा. दीपक अहिरे व रविंद्र पाटिल यांनी केले तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले. द्वितीय सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. या सत्राचे अध्यक्ष दत्तु ठोकळे पुणे  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी व माजी महापौर रंजना भानसी यांचेसह कवियत्री लता पवार, बा. ह. मगदुम व अरुण कटारे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी अ.भा.म.सा.प.च्या वतीने मागणी केल्याप्रमाणे नाशिक शहरात साहित्यिक भवन उभारण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र भरातुन तब्बल ७८ पेक्षा जास्त कविनीं कविता सादर करत कविसंमेलन गाजवले. यात दिप्ती कुलकर्णी कोल्हापूर, अंजली डोळे पुणे, विलास पंचभाई, संजय गोरडे, कैलास भामरे, प्रमोद घोरपडे, संतोष तावडे शहापुर, सत्यवान वारघडे, साक्षी थोरात, अक्षय सीतापुरे, विनय पाटिल जळगाव, दत्ता देशमुख, सोमनाथ एखंडे, पापालाल पवार आदीसह अनेक कवीनीं सहभागी होत आपल्या रचना सादर केल्या. या सत्राचे सुत्रसंचालन योगेश जोशी व राजू आतकरी यांनी केले तर गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित काव्यस्पर्धेत विजेत्या कवींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. आनंद अहिरे व आयोजक तथा जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब गिरी, रविंद्र पाटील, विद्या पाटील, प्रदीप पाटील, गोरख पालवे, योगेश जोशी, राजू आतकरी, श्रीराम तोकडे, भारत पालवे, अंबादास खोटरे, शांताराम वाघ, आबा अहिरे, विवेक पाटील, विनय पाटिल, संगिता पगारे आदीसह अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!