स्वर्गीय आरके

स्वर्गीय राजाराम खैरनार उर्फ आरके, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ यांच्या श्रद्धांजली सभेसाठी सादर केलेल्या काव्यपंक्ती !

रचना :- जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१

आरके नावाची गुढी उभारुणी,
शिक्षकांसाठी जन्मास आला !
शांत, नितळ, सुस्वभावी देवा,
का तू अकाली निघून गेला !!

काय वर्णावी आपली महती,
प्रेम दिले आपण शिक्षकांना !
काय चुकले बंधुराजे आमचे,
का प्रायचीत्य दिले घरच्यांना !!

साऱ्या कुटुंबा दुःख झाले भारी,
शोभा आक्कास शब्द फुटेना !
व्याकुळ होई आपली कन्या,
भारतीताईस शोक आवरेना !!

डोळे पानवती आम्हा सर्वांचे,
आठवणी जागवता आपल्या !
तुम्हा साश्रु नयनांनी श्रद्धांजली,
तुम्ही निःशब्द केले आम्हाला !!

आरके, कमी पडलो आम्ही सारे,
जिवलगा, जीवदान देण्या तुम्हा !
आरके, आता माफ करावे आम्हा,
देवास प्रार्थना सद्गती लाभो तुम्हा !!

( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक आहेत. )
  

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!