इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
देशात कोरोनाचा वाढता प्रभाव व रुग्णांची संख्या बघता रक्ताचा तुटवडा जाणवु लागला आहे. यापुढे सर्वच ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करावे लागणार असुन ही काळाची गरज आहे. म्हणुन रक्तदान शिबीराला सर्वसामान्य जनतेने प्रतिसाद देऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री साई सहाय समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर यांनी केले. श्री साई सहाय्य समिती इगतपुरी, जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. आनंद महादेव देवळेकर व कै. सुनंदा आनंद देवळेकर यांच्या स्मरणार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्या प्रसंगी राजु देवळेकर बोलत होते.
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. ही गोष्ट लक्षात ठेवत इगतपुरी शहर वासीयांकडून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराचे उदघाटन डॉ. अशोक पाटील, डॉ. देविदास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, ग्रामीण रुग्णालयचे अधिकारी डॉ. स्वरूपा देवरे, रक्त संकलन अधिकारी नाशिक शिवाजी लहाडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. देविदास जोशी, इगतपुरी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, शरद सोनवणे, श्री सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, मनसे शहराध्यक्ष सुमीत बोधक, अजित पारख, संदीप कोतकर, गणेश घाटकर, शैलेश पुरोहित, गणेश कवटे, सुरेश संधान, सत्तार मणियार, ज्योती काळे, पूनम पार्टे आदी उपस्थित होते. नितीन चांदवडकर, रत्नदीप बिर्जे, मनोहर शिंगाडे, कृष्णा निकम, आकाश शर्मा यांनी रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Comments