
इगतपुरीनामा न्यूज दि. ०७
तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री घाटनदेवी मंदिरात इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांच्या हस्ते सपत्नीक घट स्थापना करून नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. कोरोना संबंधी सर्व नियमांचे पालन करत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, महावितरण चे सहाय्यक अभियंता प्रजापती, समृद्धी महामार्गाचे अधिकारी शक्ती यांच्यासह घाटनदेवी न्यासाचे विश्वस्त ताराचंद भरिंडवाल, भारत साळी, राजेश गुप्ता, शांताराम रिखे, नरेश गुप्ता, रामगोविंद यादव, किरण फलटणकर, सतीश मोरवाल, शैलेंद्र शर्मा, पंकज परदेशी, राजू शेख, सागर परदेशी, संतोष जगदाळे, कृष्णा करवा, सोनू भटाटे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"घाटनदेवी मंदिर येथे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शासकीय आदेशानुसार मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले असले तरी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करता कोविड नियमांचे काटेकोर पालन करूनच दर्शन घ्यावे. मास्कचा काटेकोर वापर करावा. तसेच कोरोना संबंधी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी."
- वसंत पथवे, पोलीस निरीक्षक, इगतपुरी पोलीस ठाणे
