वाडीवऱ्हे ते सीबीएस बस सेवा सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

वाडीवऱ्हे ते नाशिक बस सेवा सुरू करावी. विद्यार्थी, कामगार आणि अन्य प्रवाश्यांसाठी बस सुरू करण्याची अत्यंत गरज आहे. या भागातील विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेज सुरू काही दिवसात सुरू होणार आहे. क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी येजा करावी लागत आहे. आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसुन त्यासाठी लवकरच बस सेवा सुरू करावी. या  भागातील विद्यार्थी कामगार जनतेला दिलासा दिला पाहिजे.  त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज शहर बस सेवेचे विभागीय कार्यकारी अधिकारी मिलींद बंड यांना निवेदन देण्यात आले. लवकरच ह्या भागाचा सर्व्हे करून लवकरच बस सेवा सुरू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते व विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, ईश्वर गवते, वैभव दातीर, समाधान शिंदे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!