आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना शालेय वह्या व भोजन वाटप

ज्ञानेश्वर मेढेपाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

त्र्यंबकेश्वर येथील तळवाडे ( तूपादेवी ) त्र्यंबकेश्वर रोड येथील आधारतीर्थ अनाथाश्रमात आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व भोजन देण्यात आले, याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक त्र्यंबकराव गायकवाड उपस्थित होते. आश्रमातील मुलांनी रोहित दादा पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्र तसेच कालभैरव स्तोत्र पठण करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, सातपूर विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, जिल्हा उपाध्यक्ष कपिल भावले, शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, गोरख ढोकणे, अमोल वाघमारे, अक्षय भोसले, कारभारी कोठूळे, अमोल महाले, संदेश भागवत,अर्जुन खांडबहाले उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!