बाप रे…अंगणवाडी धान्य घोटाळा : अंगणवाड्यांतील धान्य गोण्यांमध्ये अडीच किलो धान्य कमी ??
धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे वाहन पकडले : गोण्यांमध्ये धान्य कमी असल्याचे उघडकीस

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

बालक, स्तनदा माता आणि कुपोषित बालके उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून त्यांना मोफत धान्य देण्यात येत आहे. मात्र, या मोफत धान्याच्या गोण्यांतील धान्याच्या चोऱ्या उघडकीस आला आहेत. अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या धान्याच्या गोण्या कमी वजन भरण्यात येऊन दडपशाहीने अंगणवाडी सेविकांकडे देत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने घोटीत सापळा रचला गेला. यामध्ये अडवलेल्या गाडीत कमी वजनाच्या गोण्या आढळून आल्या. संबंधित धान्य पुरवणाऱ्या ठेकेदाराकडे संशयाची सुई असून जिल्ह्यातील विविध तालुक्यात हाच ठेकेदार धान्य पुरवत असल्याने हा मोठा घोटाळा उघडकीस आल्याचे समजले जात आहे. विशेष म्हणजे सध्या देशभर पोषण सप्ताह सुरू असताना हा घोटाळा आढळल्याने शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून ह्या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

अधिक माहिती अशी की, घोटी येथील अंगणवाडीमध्ये तांदूळ, गहू यांचा पुरवठा विविध योजनांसाठी केला जातो. मात्र वजनात नेहमीच तफावत असल्याबाबत अंगणवाडी सेविकांना संशय होता. याबाबत त्यांनी अनेकदा खात्री केली असता ह्या घोटाळ्याचा संबंध ठेकेदाराशी असल्याचे निदर्शनाला आले. त्यानुसार आज धान्य पुरवणाऱ्या वाहनाला अडवून गोण्यांची खात्री केली असता प्रत्येक गोणीत अडीच किलो धान्य कमी आढळून आले. संबंधित ठेकेदार जिल्ह्यात विविध भागात धान्य गोण्या पुरवत असल्याने ह्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!