राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना दसरा दिवाळीपूर्वी ११ टक्के महागाई भत्ता व फरकाची रक्कम अदा करावी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना दसरा दिवाळीपूर्वी 11 टक्के महागाई भत्ता व फरकाची रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर पेन्शनर असोसिएशन संघटना नाशिकचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रवींद्र थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष कंकरेज आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात नमूद आहे की, केंद्रीय वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते मंजुरीच्या मान्यताप्राप्त शासन धोरणानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्त्यातील वाढ मंजूर करण्याचे धोरण शासनाने स्विकारलेले आहे. त्यानुसार सध्या १७ टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु त्या महागाई भत्त्याचा जुलै ते नोव्हेंबर २०१९ या ५ महिन्याच्या थकबाकीचा फरक प्रलंबित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२० पासून ४ टक्के, जुलै २०२० पासून ३ टक्के आणि जानेवारी २०२१ पासून ४ टक्के अशी एकूण ११ टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने ११ टक्के महागाई भत्ता, ५ महिन्याची थकीत महागाई भत्ता फरक, यासर्व रक्कमा शासकीय, निमशासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना दसरा, दिवाळी पूर्वी मिळाव्यात. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दसरा-दिवाळी आनंदात तर जाईलच यासह राज्यातील शेतकरी, लहान- मोठे व्यापारी व अनेक धंदेवाईक यांच्या उत्पन्नावर निश्चितच चांगला परिणाम होणार आहे. यासर्व परिस्थितीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शासकीय कर्मचाऱ्यांना दसरा दिवाळीपूर्वी रक्कमा मिळाव्यात अशी विनंती निवेदनात आहे. निवेदनावर  सहसचिव दिनकर ठाकरे, कार्याध्यक्ष दिलीप पाटील, खजिनदार अशोक मानकर, सह खजिनदार विजय वानखेडे, मार्गदर्शक बापूसाहेब कुलकर्णी, रामभाऊ गायटे, देव्हारे काका, महेश आव्हाड, प्रभाकर अण्णा पगारे, प्रमुख सल्लागार सुभाष पवार, अरुण पळसकर, दिलीपदादा थेटे, रमेश येवले, राजेंद्र अहिरे, संघटक इंजि. चंद्रशेखर धनक, बबनराव भोसले, सुभाष शेजोळे, ज्ञानेश्वर कासार, कायदेशीर सल्लागार ऍड. आर. डब्लु. वाघ, हेमंत पोतदार, शरद दीक्षित, बी. एल. पाटील, दिलीप सानप, अरुण मुनशेट्टीवार, महिला संघटक प्रमुख पुजा पवार, प्रतिभा गोवर्धने, कल्पना पवार, प्रतिभा गोसावी आदींच्या सह्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!