इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
१ ऑक्टोबर १९८८ पासून हजेरी सहाय्यक पदावरील सेवाकाळ सेवा निवृत्ती वेतनासाठी गृहित धरावा यासाठी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. संबंधित मत्री महोदयांसमवेत याबाबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे. २० नोव्हेंबरला झालेल्या बैठकीतील चर्चा फलद्रुप होणार आहे. हजेरी सहाय्यकांच्या मागण्यांवर महाराष्ट्र शासन सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. ह्या पार्श्वभूमीवर २८ नोव्हेंबरला परभणी येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि हजेरी सहाय्यकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व हजेरी सहाय्यकांच्या विविध प्रश्नांबाबत परभणीचे माजी आमदार विजयराव गव्हाणे यांच्याशी वेळोवेळीचर्चा झालेली आहे. प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यातील हजेरी सहाय्यकांची यादी विवरणपत्रातील माहितीसह तयार करण्याचे काम सुरू आहे. ही यादी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. हजेरी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी पुढील कामाच्या नियोजनाची रूपरेषा ठरविण्यासाठी परभणी येथे महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार दि. २८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता महात्मा फुले विद्यालय, जिंतुर रोड, एमएसईबी कार्यालयासमोर परभणी येथे माजी आमदार विजयराव गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ह्या महत्वपूर्ण बैठकीसाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि हजेरी सहाय्यकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक एस. के. कुलकर्णी, के. बी. जाधव, पटवे, भिसे, अझर खतीब, पांचाळ, भदाडे, शेख शबीर, के. आर. पाटील, कोमलसिंग राजपूत, देशमुख, राठोड, चोढे, रणमाळे, माकोडे, मंत्री, शिंदे आदींनी केले आहे.