इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षक ध्येयच्या वतीने दरवर्षी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार नाशिक येथील आर. सी. ई. एज्युकेशनचे संचालक रविंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत शिक्षक ध्येयतर्फे नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रविंद्र पाटील यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होऊन त्यांना माजी आरोग्य राज्यमंत्री डाॅ. शोभा बच्छाव यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. पाटील यांचे कार्य अतुलनीय असल्याचे डाॅ. बच्छाव यांनी यावेळी सांगितले.
तया यशाबद्दल धन्वंतरी हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. दिनेश बच्छाव, सिंधुबाई पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलु मिर्झा, प्रहार अपंग संघटनेचे शहराध्यक्ष ललित पवार, उपाध्यक्ष रुपेश परदेशी, प्रहार इगतपुरीचे नितीन गव्हाणे, स्वामी विवेकानंद कालिबारी ट्रस्टचे सचिव सुरोजित सेनगुप्ता, भाजप दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष विनायक कस्तुरे, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, कल्पेश जेजुरकर आदींनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.