इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
आदिवासी नागरिकांना मोफत जातीचे दाखले, रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी बिरसा क्रांतीदल नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी जनतेसाठी शासन विविध योजना राबवत असते. यासाठी कोट्यवधी रूपयांचे निधी मंजूर केले जातात. असे असतांना अनेक योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचत नाही. स्वातंत्र्यानंतर अद्याप आदिवासी जनतेचा म्हणावा तसा अपेक्षित विकास झालेला नाही. आदिवासींना मोफत जातीचे दाखले आणि रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी गावोगावी कँम्प घेवून मार्गदर्शन शिबिर घेण्यात यावे. विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश लहांगे, जिल्हा सचिव बाळा कचरे, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास लहांगे, नाशिक तालुकाध्यक्ष गणेश वारघडे, गणेश लांडे, गणेश कचरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.