
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
प्रगतिशील लेखक संघ दिंडोरी तालुका बैठकीत दिंडोरी तालुक्यातील नवीन कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. यावेळी जितेंद्र शिरसाट यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून प्रा. संतोष खरे, उपाध्यक्ष शांताराम पगार, खजिनदार म्हणून शरद शिरसाट यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी दिंडोरी पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू चव्हाण उपस्थित होते. नाशिक जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे, उपाध्यक्ष संजय दोबडे त्याचबरोबर जिल्हा सचिव प्रल्हाद पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नौशाद अब्बास तसेच त्र्यंबकेश्वर तालुका पदाधिकारी तुकाराम चौधरी यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी राज्याचे महासचिव राकेश वानखेडे यांनी प्रगतिशील लेखक संघाच्या इतिहासाची आठवण करून दिली. पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या प्रगतिशील लेखक संघाच्या साहित्यिक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रगतिशील लेखक संघाची सभासद नोंदणी, कार्यकारणी पुनर्रचना, तालुकास्तरीय कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.