
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस नवीन नाशिक सिडको विभाग अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या रिता माहेश्वरी यांची निवड केली असून त्यांना शहराध्यक्षा सोनिया होळकर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे, नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ तसेच युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रक्षणाताई सलगर यांनी माहेश्वरी यांची कार्यक्षमता बघून सिडको विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती, महिला तसेच पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
महिलांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करावी – राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मागणी
रिता माहेश्वरी यांनी निवड झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरुन बदनामी केली. महिलांबद्दल अपमानास्पद बोलण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे नवीन नाशिक अध्यक्षा रिता माहेश्वरी यांच्या नेतॄत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षकऻंना निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनावर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सोनिया होळकर, नवीन नाशिक अध्यक्षा रिता माहेश्वरी, शहर कार्याध्यक्षा ऐश्वर्या गायकवाड, शहर उपाध्यक्षा दीपाली अरिंगळे पाटील यांच्या सह्या आहेत. प्रविण दरेकर यांच्यावर महिलाशक्ती व महिला आयोगातर्फेही कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.