तैनवाला फाउंडेशनकडून 9 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ; कोरपगाव, इगतपुरी रुग्णालयाला केले वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29
ऑक्सिजनच्या जीवघेण्या टंचाईमुळे सगळीकडे तडफड सुरू आहे. रुग्णालये आणि आरोग्य व्यवस्थापनाला ऑक्सिजनसाठी वेदनादायी धावपळ करावी लागते आहे. इगतपुरी तालुक्याची परिस्थिती ह्यापेक्षा वेगळी नाही. अशा विदारक काळात इगतपुरी तालुक्याच्या मदतीला रमेश तैनवाला फाऊंडेशन धावले आहे. ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी 9 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्रांची मदत तैनवाला फाउंडेशनने दिली आहे. यापैकी कोरपगाव कोविड सेंटरमध्ये 5 आणि इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला 4 यंत्र देण्यात आले. शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या समन्वयाने आज 9 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्र दोन्ही रुग्णालयांच्या सेवेत दाखल करण्यात आले. तैनवाला फाउंडेशन आणि गोरख बोडके ह्या दोघांच्या सहाय्यामुळे इगतपुरी तालुक्यातील अनेक रुग्णांचा मौल्यवान प्राण वाचवण्याला हातभार लागणार आहे. ह्या कामगिरीबद्धल त्यांचे तालुक्याच्या वतीने आभार मानण्यात आले.
कोविडचा वाढता संसर्ग अनेकांच्या मुळावर घाला घालत आहे. यामुळे अनेक गावांतील रुग्णांना कोरोनाच्या संसर्गामुळे शासकीय संस्थेत उपचार घ्यावे लागतात. मात्र कोविड सेंटरमधील दाखल रुग्ण आणि ऑक्सिजन यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे ऑक्सिजनसाठी यंत्रणेला अनेक उंबरठे झिजवावे लागतात. ह्यामुळे ह्यावर तातडीने उपयोगात आणण्यासाठी उपयुक्त असणारे 9 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्र इगतपुरी तालुक्यासाठी द्यावे अशी मानवता जपणारी भावना रमेश तैनवाला फाउंडेशनच्या मनात आली. गोंदे दुमाला येथील सॅमसोनाईट कंपनीचे जॉइन्ट व्हेंचर रमेश तैनवाला यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या समन्वयातून 9 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्र इगतपुरी तालुक्यासाठी दिले.
माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी रमेश तैनवाला फाउंडेशनच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्रांचे वाटप केले. कोरपगाव कोविड सेंटर येथे 5 यंत्र, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला 4 यंत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख आदी उपस्थित होते. प्रशासन आणि तालुक्याच्या वतीने तैनवाला फाउंडेशन आणि गोरख बोडके यांचे आभार मानण्यात आले.

Similar Posts

Comments

  1. avatar
    अतिश says:

    लोकांकडून सरकारी दवाखान्यासाठी मदत घ्या आणि खाजगी दवाखान्यात o2 पाठवा.

Leave a Reply

error: Content is protected !!