मोटार सायकल अपघातात वाडीवऱ्हेचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेच्या तत्परतेने वाचले प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हेकडून नाशिककडे जाणाऱ्या मोटारसायकलीने पुढच्या कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला. शेवाळ विहीर भागाजवळ हा अपघात झाला. यामध्ये मोटारसायकल वरील २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती मिळताच त्यांनी जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने जखमींचे प्राण वाचले.

आज सकाळी ८ वाजता वाडीवऱ्हेकडून नाशिककडे जाणारी मोटार सायकल क्रमांक MH 15 DG 9540 ह्या मोटार सायकलने पुढच्या कंटेनरला जोरदार धडक दिली. ह्या अपघातात मोटरसायकल वरील दशरथ भिमाजी शेजवळ वय 35, हिरामण वामन पालवे वय 37 दोघे राहणार वाडीवऱ्हे हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच  जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने जखमींचे प्राण वाचले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!