इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच : पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट ; धरणाजवळ पर्यटकांची वाढतेय गर्दीच गर्दी

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

इगतपुरी तालुक्यात गणपती स्थापनेपासुन मुसळधार पावसाने चांगला जोर धरला आहे. शहरासह सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या धुवाधार पावसामुळे शहर आणि परिसरात शुकशुकाट पसरला आहे. शनिवारी एका दिवसात ४५ मि. मी. पाऊस पडला असुन आज पर्यंत इगतपुरी तालुक्यात एकुण २६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुख्य मानले जाणारे भावली व भाम धरण १०० टक्के भरले असून तुडूंब ओसंडुन वाहत आहे. तर काही धरणाच्या जल साठ्यामध्ये वाढ झाली आहे.

इगतपुरी शहरात धुवाधार पावसाने सर्वत्र गारवा पसरला असून कसारा घाट, घाटमाथा, महामार्गावर, शहराला धुक्याने वेढले असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. विकेंड असल्याने भावली धरण परीसर व धबधब्याजवळ पर्यटकांनी असंख्य गर्दी करत निसर्गाचा आनंद घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटकांच्या वाहनामुळे भावली धरण परीसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.

दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यावर ३ दिवसांपूर्वी गणपती बाप्पा आगमना निमित्ताने खड्डे डागडुजीसाठी मुरूम ऐवजी लाल माती टाकण्यात आली होती. या लाल मातीमुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असुन खड्डे कमी होण्याऐवजी आणखी खडुयाची वाढ झाली. या जोरदार पावसाने ही लाल मातीही वाहून गेली असुन धो धो पडणाऱ्या पाऊसामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत येण्यास टाळल्याने बाजारपेठ मंदावली होती.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!