निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
गौरी गणपती उत्सवाच्या काळात घरोघरी गणपतीची स्थापना होत असते. याच काळात जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्यासाठी वृक्ष बँकेची स्थापन करून अभिनव असा उपक्रम उमेश शिंदे यांनी हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीमार्फत नागरिकांना आज मोफत बेल, जांभूळ, गोल्डन सीताफळ, कदंब आदी वृक्षांची १०१ रोपे वाटप करण्यात आली.
वृक्ष बँकेमार्फत देशी वृक्षांचे रोप स्वीकारलेल्या सदस्यांना एक व्यक्ती एक रोप असे वाटप करून त्याचे रोपण व काळजीपूर्वक संवर्धनासाठी हमीपत्र घेण्यात आले. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळालेल्या वृक्षाचे रोपण केल्यानंतर सेल्फी फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही तर ती अधिक वाढली पाहिजे असे मत उमेश शिंदे यांनी आपल्या मनोगतात मांडले. आम्ही वारंवार सर्व नागरिकांच्या संपर्कात राहून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यासाठी वेगवेगळे कृतिशील उपक्रम वर्षभर राबवित राहण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
वृक्ष बँकेच्या माध्यमातून अनेक दानशूर पर्यावरण प्रेमीं नागरिकांनी यापुढे कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस, दशक्रिया, श्राद्ध विधी,पुण्यस्मरण, विवाह आदी कार्यक्रमात बडेजाव रूढी परंपरेला फाटा द्यावा. त्यासाठी आमच्या संस्थेच्या वृक्ष बँकेत रोपांच्या स्वरूपात डिपॉजिट करू शकतात. जेणे करून वृक्ष बँकेकडून मोफत वृक्ष वाटप उपक्रमाला हातभार लागणार आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष उमेश शिंदे, नगरसेवक सुरेश खेताडे, संजय शिंदे, नितीन माळोदे, पोपट शिंदे, विधीतज्ञ कैलास शिंदे, संजय देशमुख, निवृत्ती मते, रामभाऊ जाधव, दिनकर माळोदे, मधुकर शिंदे, शांताराम वाघ, गणपत शिंदे, पूजा शिंदे, विजया मोरे, मीनाताई माळोदे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत वृक्ष वाटप करण्यात आले.