इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
नाशिक जिल्हयातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण मिळावे, त्यातूनच त्यांना रोजगार मिळावा यासाठीच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सेंटूल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे ( सिपेट ) व्यवसायिक शिक्षण, प्रशिक्षण केंद्र नाशिक जिल्ह्यात उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या उद्योग विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे. प्रस्तावित प्रकल्पाला लागणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने आज जिल्हा प्रशासनाला विशेष पत्र पाठविले आहे. सिपेटच्या केंद्रामुळे दरवर्षी दीड ते दोन हजार तरूणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षणांची संधी मिळून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
गेल्या काही वर्षापासून बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याची मागणी अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार गोडसे यांच्याकडे होत होती. बेरोजगारांच्पा वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेवून नाशिक जिल्ह्यात सिपेटचे व्यवसायिक शिक्षण, प्रशिक्षण उभारण्यासाठी खासदार गोडसे यांनी मागील काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. दिल्ली मंत्रालयातील सिपेटच्या प्रशासनाशीच सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर गोडसे यांनी मागील आठवडयात राज्याच्या उद्योग विभागाचे सेक्रेटरी बलदेव सिंह यांची भेट घेवून नाशिक परिसरात सिपेटचे व्यावसायिक शिक्षण,प्रशिक्षण केंद्र उभारण्याविषयीची आग्रही मागणी केली होती.
खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने बलदेव सिंह यांनी त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेत नाशिकला सिपेटचे केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता दिली. प्रस्तावासाठी जागा उपलब्ध करून देण्याविषयीचे पत्र दोन दिवसांपूर्वीच उद्योग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.केंद्र उभारणीसाठी सुमारे पंधरा एकर सरकारी जागेची आवश्यकता आहे. जागा उपलब्धतेचा अहवाल तातडीने मंत्रालयात पाठविण्यासाठी खासदार गोडसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याशी चर्चा केली असून याकामी जिल्हा प्रशासनही सकारात्मक आहे. प्रस्तावित केंद्र मंजूर झाल्यास दरवर्षी दीड ते दोन हजार तरूणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षणांची संधी मिळून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group