
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी तालुक्यातील भरवज निरपण ग्रामपंचायतीच्या सरपंच जाईबाई भले, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख आकाश भले आणि सेतू संचालक मयूर पहाडे यांनी महाराजस्व अभियान विस्तारित योजने अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिरात राबवलेल्या योजनेनुसार आणि विस्तारीत समाधान योजनेद्वारे दाखल्यांच्या वाटपाचा कार्यक्रम इगतपुरी येथील तहसीलदार कार्यालयात संपन्न झाला. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका आणि तत्सम कामे, संजय गांधी योजना, उत्पन्न दाखले, आधार, बँक खाते आदींच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
भरवज निरपण येथे खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरित्या राबवण्यात आले होते. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सरपंच जाईबाई भले, आकाश भले, बाळा गव्हाणे यांचे कौतुक केले. कार्यक्रमावेळी उपसरपंच शारदा साळवे, प्रकाश भले, वाळू भले, अर्चना घारे, सीताराम गावंडा, राजेश घारे आदी उपस्थित होते. आगामी काळात नागरिकांसाठी अशा प्रकारचे शिबीरे राबवली जातील असे आकाश भले यांनी सांगितले.