
सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक येथे आदिवासी सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. काँग्रेसचे त्र्यंबक तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे व इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नातून हे काम साकारत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुकच्या दापुरे येथे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपयोजनेतंर्गत ५० लाखाची सांस्कृतिक भवन इमारत मंजुर करण्यात आली आहे.
ह्या इमारतीचे भुमिपुजन इंजि. अजित सकाळे, भास्कर खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत झारवडचे लोकनियुक्त सरपंच चंदर लोभी, उपसरपंच सोमनाथ बोराडे, ग्रामसेवक स्वप्नील पाटील, ग्रामपंचायत सदस्य शोभा शिद, कृष्णा ठवळे, विष्णु झुगरे, सिताबाई भुतांबरे, कल्पना गोंदके, द्वारका खाडे, कर्मचारी लभावराव लोभी, बाळू नारळे, वसंत हंबीर उपस्थित होते. इमारतीचा उपयोग पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ म्हणुन व सामाजिक कार्यक्रमांसाठी होणार असून याचा फायदा आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.