लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १
श्रावण महिनातला पहिला सोमवार म्हणजे साक्षात भगवान शंकराची आराधना करणे होय. या माध्यमातून छोट्या मोठ्या मंदिरात जाऊन भाविक पूजा करतात. यातच मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला येथील १९७० ओल्ड प्रभू ढाब्याजवळ प्राचीन महादेव मंदिरात भाविकांची गर्दी वाढली आहे. श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची मांदियाळी याठिकाणी दर्शनासाठी होत असते. सकाळपासूनच भगवान शंकराची यथोचित पूजा आरती करण्यात येते. हेे महादेव मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. अनेकांची मंदिरावर श्रद्धा असून प्रत्येकाला धार्मिक कार्याची प्रेरणा यातून मिळते. त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग मंदिरात दूरवर जायला जमले नाही असे भाविक भक्त दर्शनासाठी या मंदिरात येऊन दर्शन घेतात.
ओल्ड प्रभू हॉटेलचे संचालक बंडोपंत लिंबाजी चाटे हे १९७० पासून दररोज सकाळ सायंकाळी न चुकता नियमितपणे मंदिराची पूजा आरती करतात. मंदिरात अनेकांच्या मनोकामना, आकांक्षा पूर्ण होतात असे ओल्ड प्रभुचे संचालक विलास भाऊ चाटे नेहमी सांगत असतात. महामार्गावरून येणारे साधू संत देखील येथे दर्शनासाठी थांबतात. शिर्डीकडे जाणारी साई पालखी, साधू संतांना ओल्ड प्रभू ढाब्यातर्फे नेहमीच अन्नदान केले जाते. हे मंदिर अगदी छोटे असून मंदिराचा विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले आहे.