शिदवाडी येथील १९ वर्षीय युवक वीज कोसळल्याने जागीच ठार ; मयताच्या कुटुंबाला अर्थसहाय्य देण्याची सरपंच आघाण यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी गावातील १९ वर्षीय आदिवासी युवकावर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या घटनेने शिदवाडी येथे शोककळा पसरली आहे. दौंडत शिवारात ज्योती कंपनीच्या जवळ दारणा नदी भागात ही घटना घडली. युवकावर अचानक वीज पडल्याचे समजताच पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथ तोकडे यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना माहिती दिली. वीज पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबाला शासनाने तात्काळ अर्थसहाय्य करावे अशी मागणी खैरगावचे सरपंच ऍड. मारुती आघाण यांनी केली आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी गावातील अहिलू देवराम शिद हा १९ वर्षीय युवक दौंडत शिवारातील ज्योती कंपनीजवळील दारणा नदी भागात काही कामानिमित्त गेला होता. त्याच्यासोबत त्याचे आजोबा मुलाचे लहु बहिरू शिद हे होते. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वारा आणि गारपीट सुरू झाली. यावेळी विजेच्या कडकडाट सुरू होता. त्याचवेळी अचानक अहिलू शिद याच्यावर अचानक वीज कोसळली. यामुळे तो अतिशय गंभीर जखमी झाला. ह्या घटनेबाबत समजताच पंचायत समितीचे माजी उपसभापती रघुनाथ तोकडे यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना माहिती दिली. गंभीर जखमी अहिलू शिद याला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेतांना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. यामुळे शिदवाडी भागात शोककळा पसरली आहे. वीज कोसळून मयत झालेल्या युवकाच्या कुटुंबाला तातडीने अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी खैरगावचे सरपंच ऍड. मारुती आघाण यांनी केली आहे. माजी सभापती रघुनाथ तोकडे, खैरगावचे उपसरपंच गणेश गायकर, शेणवडचे उपसरपंच कैलास कडू, राजू आगीवले, विलास उघडे, खैरगावचे सरपंच ऍड. मारुती आघाण यांनी मदतकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!