केपीजी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची एन. आय.आय.टी तर्फे आय.सी.आय.सी.आय बँकेत निवड


इगतपुरीनामा न्यूज दि. १६ :

इगतपुरी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व एन.आय.आय.टी.तर्फे ५ व ६ मार्चला मुलाखती घेण्यात आल्या.

मुलाखतीवेळी एकूण 43 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी ऋतुजा आव्हाड, सुवर्णा शेवाळे, विक्रम कापसे, गणेश वाजे या चार विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी आय बँकेत नोकरीसाठी निवड झाल्याने विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेचे संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी अभिनंदन केले. यासाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. जी.एस.लायरे, जी.टी.सानप, डॉ. श्रीमती के. एम. वाजे, ए.बी. धोंगडे, प्राध्यापक व इतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया :
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवत असते.मला आय. सी. आय.सी.आय बँकत नोकरी मिळाल्याने मला माझ्यासह आईवडिलांना आनंद झाला आहे.”
विक्रम कापसे, निवड झालेला विद्यार्थी

इगतपुरी : आयसीआयसीआय बँकेत निवडत झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. पी.आर भाबड़, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा.जी.एस.लायरे, प्रा. श्रीमती. ए.बी.धोंगडे, प्रा.जी.टी. सानप. (फोटो : निलेश काळे)

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!