इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रुग्णालय इगतपुरीत कोरोना लसीकरण केंद्र सोमवारी सुरू करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरुपा देवरे, सहकारी डाॅक्टर, नर्स आदींचा फुले देऊन सत्कार करण्यात आला.
लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरुपा देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, इगतपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला पेखळे आदींचे सहकार्य लाभले. घोटी शहरासाठी लसीकरण केंद्र सुरू होत असून घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी दि. १८ पासुन सुरु होणार आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी दिली.

