इगतपुरीनामा न्यूज दि. १६
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रवींद्र पगार व जिल्हा युवा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व जिल्हा कार्यकारणी यांच्या झालेल्या बैठकीत इगतपुरी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनीष बागडे यांनी सागर वाजे यांची इगतपुरी तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करुन अभिनंदन केले यावेळी इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे ,जिल्हा सरचिटणीस पांडुरंग वारुगंसे ,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर, युवा कार्याध्यक्ष सागर टोचे ,संतोष वरदळ,संतोष वारुंगसे, गणेश मते, जनार्दन भगत ,गणेश भागडे, रमाकांत राक्षे, निवृत्ती गतीर, सिन्नर तालुका युवक अध्यक्ष जयराम शिंदे, अमोल बच्छाव ,संदीप खैरे आदी उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील युवकाचे एकत्रीकरण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त युवा उपाध्यक्ष सागर वाजे यांनी यावेळी सांगितले या निवडीबद्दल सागर वाजे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.