इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड भैरव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू आहे. ह्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी येथे लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉब्रीड व आरोग्य फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी एकूण ३५ नागरिकांनी लस घेतली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत जवळपास एकूण ११५ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. यापुढेही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लसीकरण असणार आहे. लसीकरणासाठी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गुप्ता, डॉ. श्रीकांत देशमुख, आरोग्य सहाय्यक डी. एम. देशमुख, एच. व्ही. सुर्यवंशी, आरोग्यसेवक डी. डी. जाधव, ए. एम. पाटील, एस. एस. आहिरे, पी. यु. बागुल, तानाजी पावसे आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. लसीकरणावेळी कोरोना नियमांचे कडक पालन करण्यात येत आहे.
