समृद्धी जोडमार्ग संपादनातील बाधितांना १२ पट मोबदला द्या : इगतपुरी तालुक्यातील साकुर, आहुर्ली, वाडीवऱ्हे येथे शेतकरी संघटनेची सभा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची बैठक इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत संपन्न झाली. व्हिटीसी फाटा ते साकुर फाटा समृद्धीमार्ग जोड रस्त्यासाठी जमीन संपादित जमिनीचा १२ पट मोबदला मिळावा, गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे, शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी साकुर येथील सभेप्रसंगी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. आहुर्ली येथे पार पडलेल्या सभेत 1972/73 मध्ये वैतरणा धरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली असून त्या धरणाचे पाणी मुंबई महापालिकेला जात आहे. मात्र इथल्या धरणग्रस्त व्यक्तीला नोकऱ्या मिळालेल्या नाही. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी शेतकरी संघटना मोठा लढा उभा करण्याचे ठरवण्यात आले.

शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीने फसवणूक केल्यामुळे कंपनीलाही धडा शिकवून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली .या महत्वाच्या विषयांवर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सीमा नरोडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. सभेसाठी नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, ज्येष्ट नेते शंकरराव पुरकर, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर ढिकले, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, उपजिल्हाध्यक्ष तानाजी झाडे, इगतपुरी तालुकाध्यक्ष किसन शिंदे, जेष्ठ नेते बाळासाहेब नाठे, उपतालुकाध्यक्ष अरूण जुंद्रे, तालुका सचिव रामदास गायकर , सहसंघटक रामनाथ जाधव, गटप्रमुख भाऊसाहेब गायकर, आदिवासी सेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शेंडे, काळू सोनवणे आदींसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वतीने साकुर येथील माजी सभापती आनंदराव सहाणे, चेअरमन मधुकरराव सहाणे, सरपंच विनोद आवारी, ईश्वर सहाणे तसेच आहूर्ली येथील संतु पाटील गायकर, दत्तु गायकर, रामचंद्र गायकर, दिलीप मेदडे, राजाराम गायकर, गोविंद खकाळे, रूंजा वाघ आदी शेतकरी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!