गोंदे दुमाला भागात ५५ वर्षीय महिलेचा आढळला मृतदेह : ओळख पटवण्याचे वाडीवऱ्हे पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मुंबई आग्रा महामार्ग  भागात ५५ वर्षीय अनोळखी फिरस्ती महिलेचा मृतदेह आढळला आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी आवाहन केले आहे. ह्या महिलेबाबत अथवा तिच्या नातेवाईकांबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवण्यात यावे असे आवाहन केले आहे.

अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी पावणेआठला भगर मिलच्या मागे एक अनोळखी महिलेचे प्रेत पडले असल्याबाबत पोलीस पाटील कमलाकर भिकाजी नाठे यांनी पोलिसांना कळवले. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास फड आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी याबाबत नोंद घेतली आहे.

फिरस्ती अनोळखी महिलेचे वय अंदाजे ५५ असून शरीराने सडपातळ, उंची ५ फूट ४ इंच, रंगाने सावळी, अंगात हिरव्या रंगाचा टॉप, निळ्या रंगाचा परकर, नाक सरळ, ब्लॅंकेट गुंडाळलेली आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन वाडीवऱ्हे पोलिसांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!