विकास शेंडगे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यातील मुरंबी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जया रेवन मते यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुरंबी येथील उपसरपंच निवडीची बैठक सरपंच संगीता मते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जया रेवन मते यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे जया रेवन मते यांची उपसरपंचपदी निवड झाली.
मावळत्या उपसरपंच मनिषा दत्तु मते यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर आज निवडीची बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थित पार पडली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष मते, रतन शिंदे, सुनिल पालवे, लता गायकर, मनिषा पाडेकर, लहानु बेंडकुळे आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक भाऊसाहेब सागर यांनी काम पाहिले. यावेळी संपत मते, शिवाजी हाडके, तानाजी मते, बापू मते, दत्तु मते, रेवन मते, भाऊसाहेब मते. गोकुळ रामदास मते. सचिन मते, गणेश मते, सुखदेव बागुल, हिरामण तांबे, विलास पाडेकर, नामदेव दळवी, धनंजय मते, शंकर मते,राजाराम मते, खंडु बेंडकुळे,केवराम मते, नंदु गायकर, योगेश मते,पांडुरंग पोटिंदे, गोरख बाळनाथ,अर्जुन हुल्लूळे, अनिल मते, गोरख मते, भारत पालवे, मुरली पालवे, सागर मते, अंकुश मते आदी नागरिकांनी नवनिर्वाचित उपसरपंच जया मते यांच्या निवडीचे स्वागत केले