तलाठ्यांकडून अंजनेरी येथे शेतकऱ्यांना पिकपहाणी ॲपचे प्रशिक्षण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई पिक पहाणी ॲपची निर्मिती शेतकऱ्यांना स्वतः आपली पिकपहाणी करण्यासाठी केलेली आहे. पिकपहाणी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी भागात ॲपचे प्रशिक्षण तलाठी सत्यजित गोसावी  यांच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. याबाबत प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक गिरासे यांनी तलाठ्यांना मार्गदर्शन केले आहे.
तलाठी सत्यजित गोसावी यांनी अंजनेरी, पेगलवाडी त्र्यं, पेगलवाडी ना, चाकोरे, तलाठी सागर पवार यांनी खंबाळे, वाढोली, मुळेगाव, तलाठी संतोष जोशी यांनी त्र्यंबकेश्वर परिसरात, तलाठी डोंगरे यांनी सामुंडी परिसरातील या गावांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यासाठी प्रत्येक गावातील 20 युवा शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी युवा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

या ॲपमुळे शेतकरी आता आपली पिकपहाणी प्रत्येक हंगामनिहाय स्वतः करू शकतात. प्रशिक्षणात त्यांना निर्भेळ पिके, जलसिंचन साधने, पडीत क्षेत्र ,बांधावरची झाडे कशाप्रकारे आपल्या उताऱ्यावर लावता येईल याची माहिती देण्यात आली. यामुळे नैसर्गिक आपत्ती वेळी अचूक नुकसान भरपाई देणे शक्य होणार आहे. शासनाला पिकांची अचूक आकडेवारी मिळाल्याने त्याप्रमाणे पुढील योजना बाबत नियोजन करण्यास उपयोग होणार आहे. अंजेनेरी येथील प्रशिक्षणासाठी हेमंत बोडके, सोमनाथ चव्हाण, गणेश चव्हाण, कमळू कडाळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!