१८ ते ४० वयोगटातील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २४२८ जागांवर नोकरी मिळण्यासाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी याबाबत सविस्तर माहिती सांगताहेत.
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ दहावी पाससाठी नोकरीची संधी
आज शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात तसेच आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागासह आदिवासी भागात देखील पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी मिळविलेले विद्यार्थी बेरोजगार म्हणून दिसतात. ज्यांचे शिक्षण दहावी पर्यंत झालेले आहे असे विद्यार्थी आपल्याला नोकरी कशी मिळेल ? या संभ्रमात असतात. परंतु जे विद्यार्थी दहावी पास आहेत त्यांना पोस्ट विभागात नोकरीची संधी आहे. तेंव्हा या संधीचा फायदा अवश्य घ्या.
■ महाराष्ट्र पोस्ट सर्कल
भारतीय टपाल खात्यात महाराष्ट्र पोस्टल सर्कल ( Maharashtra Postal Circle ) अंतर्गत ग्रामीण डाक सेवक ( Gramin Dak Sevak ), शाखा पोस्टमास्तर ( Branch Postmaster ), शाखा सहाय्यक पोस्टमास्तर ( Assistant Branch Postmaster ) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार २४२८ जागांची भरती होणार आहे. जे विद्यार्थी दहावी पास आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी होय. महाराष्ट्रात नोकरीची ही संधी आहे.
■ अर्ज पध्दती व वयोमर्यादा
यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून शैक्षणिक पात्रता दहावी पास ही होय. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २६ मे २०२१ ही आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा नाही किंवा मुलाखत नाही. दहावीला मिळालेल्या मार्कांच्या आधारे गुणवत्ता यादी ( Merit List ) तयार केली जाणार आहे. तेंव्हा नक्कीच या संधीचा फायदा घ्या. दहावीपेक्षा उच्च शिक्षण घेतलेले देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांचे दहावीचेच मार्क गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत हे लक्षात घ्या.
■ ऑनलाईन अर्ज
ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करावयाचा आहे त्यांनी याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती https://bit.ly/3etPJsc या संकेतस्थळावर पहावी. विद्यार्थ्यांनी या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करून, अवलोकन करुन अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज https://appost.in/gdsonline या संकेतस्थळामार्फत भरावा. वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ही असून रुपये १०० यासाठी फी आहे.
■ पदासाठींचे आरक्षण
या जागांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण आहे
1. EWS – 246 जागा
2. OBC – 565
3. PWD-A – 10
4. PWD – B – 23
5. PWD- C – 29
6. PWD- DE – 15
7. SC – 191
8. ST – 244
9. UR – 1105
याप्रमाणे आहे.
■ इतर महत्वाचे
अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची पध्दती, स्थानिक भाषेचे ज्ञान, Basic Computer Training, फी पाठविण्याची प्रक्रिया, अर्जात भरावयाची माहिती आदी संदर्भात वर दिलेल्या संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक अभ्यासून ऑनलाईन अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावा.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )
3 Comments