ज्ञानेश्वर मेढेपाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि.१५
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामस्थ, विविध शाळेचे शिक्षक, सरकारी कर्मचारी, मोजके विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत आंबोलीचे ध्वजारोहन सोसायटीचे माजी चेअरमण संजय मेढेपाटील यांच्या हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोलीचे ध्वजारोहण रुग्णकल्याण समिती अध्यक्ष ॲड. भास्कर मेढेपाटील यांच्या हस्ते, प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण ॲड. शरद मेढेपाटील यांच्या हस्ते, कॉ. नाना मालुसरे येथील ध्वजारोहण पोलीस पाटील अश्विनी मेढेपाटील यांच्या हस्ते, शासकीय आश्रम शाळेचे ध्वजारोहण युवा मंचचे योगेश मेढेपाटील यांच्या हस्ते झाले.