गडकिल्ल्यांवर तिरंग्याचे ध्वजारोहन होण्याच्या जागृतीसाठी २० वर्ष प्रयत्न : इंद्राई किल्ल्यावर कळसुबाई मित्र मंडळाकडून अनोखा स्वातंत्र्यदिन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी चांदवड जवळील इंद्राई किल्ल्यावर ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला। तिसऱ्या शतकातील अतिशय प्राचीन इतिहास असलेल्या   इंद्राई किल्ल्यावर तिरंगाचे ध्वजारोहन गिर्यारोहकांकडून करण्यात आले. स्थानिक ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय, पुरातत्व विभाग, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांवर तिरंग्याचे ध्वजारोहन करावे अशी जनजागृती यावेळी करण्यात आली. ही जागृती करण्याच्या उद्देशाने कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षांपासून दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या गडकिल्ल्यांवर जाऊन स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

आज कळसुबाई मित्र मंडळाच्या कार्यक्रमात इंद्राई किल्ला आणि तिरंगा ध्वजाचे पूजन करण्यात आले. ध्वजारोहण सुरेश कडू यांच्या हस्ते करण्यात आले. गिर्यारोहकांनी भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, जय हिंद या घोषणांनी इंद्राई किल्ला दुमदुमून गेला. इंद्राई किल्ल्यावर ध्वजारोहण करून  महाराष्ट्रातील दुर्लक्षित किल्लांचा इतिहास व गडांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी. त्यातून गडकिल्ल्यांचे संवर्धन होऊन ऐतिहासिक वारसा जपला जावा असा मंडळाच्या गिर्यारोहकांचा उद्धेश आहे.

या ध्वजारोहनप्रसंगी अध्यक्ष भगीरथ मराडे, सुरेश कडू, बाळासाहेब आरोटे, अशोक हेमके, गजानन चव्हाण, प्रवीण भटाटे, काळू भोर, प्रशांत येवलेकर, बाळासाहेब वाजे, निलेश पवार, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, गोकुळ चव्हाण, उमेश दिवाकर, बालाजी तुंबारे, आदेश भगत, ज्ञानेश्वर मांडे, गोविंद चव्हाण, संतोष म्हसणे, सोमनाथ भगत, भगवान तोकडे, पुरुषोत्तम बोराडे, पांडू भोर, संदीप खैरनार, दीपक कडू, परमेश्वर गीते, देविदास पाखरे आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.