माझा देश महान

रचना : सौ. माधुरी पाटील शेवाळे
संवाद : ७५८८४९३२६०

देशा मिळालं स्वातंत्र्य
आहे संस्कृतीची शान
तोचि दिन सोनियाचा
माझा भारत महान..!!१!!

शूर लढवय्ये झाले
सुखदेव राजगुरू
बलिदान देशासाठी
नाव बाबू गेनू स्मरु…!!२!!

असे मज अभिमान
मिळे स्वातंत्र्य देशाला
सारे मिळून नमन
करू भारत मातेला…!!३!!

होते लाल बाल पाल
देशासाठी योगदान
आंदोलने चळवळी
त्यात त्यांचे बलिदान..!!४!!

साधू संत तुकाराम
भूमी पवित्र पावन
सुख नांदत देशात
करू भारता वंदन..!!५!!

देश रक्षण करण्या
हाती बंदूक घेऊन
उभे लढाया सैनिक
रात्री पहारे देऊन…!!६!!

ध्वज भगवा तिरंगा
अभिमान जगताला
राष्ट्रध्वज भारताचा
देत सलामी झेंड्याला…!!७!!

करू देशाचा आदर
राखू तिरंग्याची शान
भारताचे संविधान
गाऊ त्याचे गुणगान..!!८!!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!