भरवीर खुर्द येथील 13 शेळ्यांना फस्त करणारा बिबट्या शेवटी जेरबंद

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

भरवीर खुर्द येथे 3 ऑगस्टला 13 शेळ्या फस्त करणारा बिबट्याला जेरबंद करण्यात इगतपुरी वनविभागाला यश आले आहे. रविवारी रात्री 11. 45 च्या दरम्यान वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया अडकला. याबाबत माहिती कळताच भरवीर खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत वनविभागाचे आभार मानले आहे.

यावेळी किरण शिंदे, इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील, वन परिमंडळ अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एफ. जे. सैय्यद, एम. पाडवी, आर. टी. पाठक उपस्थित होते.