कोरोना लस घेतल्यानंतर पुढे काय होतं ? यावर उपाययोजना कोणत्या ?
इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना मार्गदर्शन करताहेत डॉ. अविनाश गोरे

लस घेतल्यानंतर नेमकं काय होतं ? अशी शंका अनेकांना आहे. याबाबत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना मार्गदर्शन करताहेत डॉ. अविनाश गोरे. घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात ते वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. ■ जर समजा तुम्ही दुपारी  २ वाजता लस घेतली तर त्या दिवशी तुम्हाला शक्यतो काहीच त्रास होणार नाही. पण रात्री झोपल्यानंतर रात्री थोडीशी थंडी आल्यासारखी वाटेल..
■ अंगात ताप असल्यासारखे वाटेल. परंतु जर तुम्ही थर्मोमिटरने ताप चेक केला तर तो बहुधा नॉर्मल म्हणजे १००℃ पेक्षा कमीच भरेल.
■ अंगात किंचित, कमी अधिक प्रमाणात कणकण जाणवू शकते.
■ बरेच डॉक्टर, सिस्टर आणि मेडिकोज तुम्हाला अशा वेळेस 1) T.Crocin500mg / Fepanil500mg /Paracetamol 500mg / Dolo 650mg अशा प्रकारच्या टॅब्लेटस घ्यायचा सल्ला देतील. Or T.Zerodol-P. जर तुम्हाला जास्त डिस्कम्फर्ट वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही ती टॅबलेट घेऊ शकता. अथवा न घेता सहन करू शकता. याला  immunogenic response Of Our Own Body असे संबोधले जाते. तो आला म्हणजे Body is preparing that immunogenic response.. It’s natural.. तो नैसर्गिक, आणि नॉर्मल असतो. त्याला घाबरायची गरज नसते..
■ तुमच्यापैकी काही जणांना हातपाय दुखणे, अशक्तपणा, डोके जड पडणे, डोकेदुखी, जुलाब, क्वचित उलट्या असेही लक्षणे दिसून येऊ शकतात. त्यावेळेस पण जनरल मॅनेजमेंट करायची. जी आपण नेहमी करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला लसीकरणाच्या अगोदर, नंतर तुमचे Hydration ( तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी चांगली गाठणे आवश्यक आहे. ) मेंटेन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भरपूर पाणी, लिक्विड डायट, लिंबू सरबत, ताक, मोसंबी ज्यूस, सफरचंद ज्यूस आदींचा वापर करावा. जेणे करून तुमचा येणारा ताप, ताप-तत्सम कणकण केवळ तुमच्या पाणी पिण्याने आणि इतर गोष्टींने निघून जाईल.
■ दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी, हातपाय दुखणे, पूर्ण बॉडी-पेन, अंगदुखी असे किरकोळ त्रास होऊ शकतात. पण जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी फॉलो केल्या तर तो त्रास कमी होईल. एकदा का २४ तास झाले की त्रास शून्य होतो म्हणजे संपतो.
■ दुसरा डोस हा २८ दिवसानंतर घ्यावा.  व तो लक्षात ठेवावा, लिहून ठेवावा.
■ काही जणांना इंजेक्शनच्या जागी किरकोळ सूज, लालसरपणा, हाताला जडपणा, हात हलवताना त्रास, दुखणे आदी त्रास उद्भवू शकतात. तो त्रास पण हळूहळू कमी होणारा असतो. परंतु  तुम्हाला कुठल्याही क्षणी जर वाटले की हा त्रास थोडा नॉर्मल पेक्षा वेगळा आहे. त्यावेळेस तुम्ही लगेचच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासह लगेच उपचार करावेत.
■ लसीकरण केल्यानंतर अर्धा तासात सहसा असले त्रास होतात. ते त्रास तिथे थांबून रुल आऊट म्हणजे जिथल्या तिथे देखरेखीखाली थांबून सोडवावेत. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर आम्ही तुम्हाला अर्धा तास under-obeservation ( देखरेखीखाली ) तिथेच Observation Room मध्ये थांबायला सांगतले जाते.
■ लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यावर बिनधास्त विश्वास ठेवून घ्यावे.
■ मनातील भीती पूर्णपणे काढून टाकावी. जेणे करून Psychologically ( मानसिक दृष्ट्या ) तुम्ही फिट असाल तर बाकीच्या गोष्टी ह्या सुकर होतात. ह्या बातमीची लिंक तुम्ही आपापल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, जवळच्या लोकांना पाठवू शकता. अजून कुठली पण शंका असल्यास आपण मला विचारू शकता.
– डॉ.अविनाश कि. गोरे
  वैद्यकीय अधिकारी ( बालरोगतज्ञ )
  ७९७२४२६५८५ / ७५८८०८२८७५
डॉ. अविनाश गोरे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय घोटी

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

error: Content is protected !!