इगतपुरी-घोटीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची जनसेवा प्रतिष्ठानची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. 14 : इगतपुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक, कोविडशी सामना करतांना नेहमीच आघाडीवर असलेले फ्रंट लाईन वारीयर्स यांना वेळेत कोरोनाची लस मिळावी यासाठी इगतपुरी व घोटी शहरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी ‘जनसेवा प्रतिष्ठान’ने निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना नुकतेच याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. जी. परदेशी यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू हरकत नाही, त्यासाठी कार्यालय वापरास संमती दर्शवली. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरणचंद लुणावत, आर. जी. परदेशी, ओमप्रकाश तिवारी, जे. के. मानवेढे आदी उपस्थित होते.