मुकणेचे दुग्ध व्यावसायिक आप्पा बोराडेंच्या दशक्रिया विधी निमित्ताने…
आप्पा, आपली उणीव सदैव भासत राहील…!

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

■ शब्दांकन : प्रभाकर आवारी, पत्रकार मुकणे
इगतपुरी तालुक्यातल्या मुकणे गावचे सर्वत्र सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्त्व दुग्ध व्यावसायिक मोहन (आप्पा) बोराडे यांचे १० दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. शनिवारी १३ मार्चला त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडेसे…
लोकनेते स्वर्गीय गोपाळराव गुळवे यांचे खंदे समर्थक म्हणुन सुपरिचित कै. काशिनाथ पाटील बोराडे यांच्या जाण्याला ४ महिने झाले. त्यातच त्यांचे चिरंजीव व सर्वांना परिचित असलेले दुग्धव्यवसायिक मोहन आप्पा बोराडे यांचे आकस्मिक निधन झाले. स्वतःच्या हिमतीवर दुग्ध व्यावसायिक म्हणुन अत्यंत कमी कालावधीत त्यांनी चांगली भरारी घेतली होती. सोज्वळ व मनमिळाऊ म्हणुन तर आप्पा परिचित होतेच. पण तरुणांची मोठी फळी उभी करून एक वेगळा ठसा निर्माण करण्यात ते आघाडीवर होते. आप्पांचा शब्द सर्व मित्रपरिवारात प्रमाण म्हणुन मानला जायचा. आपल्या जबाबदार वृत्तीने, आपल्या कर्तृत्वाने फक्त घरातील व्यक्तीच नव्हे तर नातेवाईकांसह संपुर्ण गावात, पंचक्रोशीत आदराने त्यांना आप्पा म्हणून ओळखले जायचे. अडल्या नडल्या व्यक्तीला मदत करणे, परोपकारी व मनमिळाऊ हा आप्पांचा स्वभाव सर्वांनाच परिचित होता.
वडील गेल्यानंतर ४ महिन्यातच आई, बहिणी, पत्नी, दोन मुले, भाऊ व पुतणे यासह नातेवाईक व मित्रमंडळी अशा सर्वानाच आप्पाचे आकस्मिक जाणे पोरके करून गेले. जन्माला आलेला प्रत्येक माणुस एक ना एक दिवस जाणारच हे ठरलेले असते पण अवेळी जाणे हे मात्र खुप वेदनादायी असते. दुग्ध व्यवसायातुन विकासाची गरुडझेप घेणाऱ्यांपैकी मोहन आप्पा बोराडे हे एक उत्तम उदाहरण होते. गुरुवारी ४ मार्चला मोहन आप्पांनी सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक दिलदार व सहृदयी व्यक्तिमत्त्व गमावल्याची सर्वांची भावना झाली आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेले दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो हीच आप्पाला भावपूर्ण श्रद्धांजली…!

कै. मोहन (आप्पा) बोराडे, मुकणे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!