इगतपुरी तालुक्यातील दारणा, भाम, वाकी खापरी धरणातून शेतकऱ्यांना पाणी परवानगी द्यावी ; प्रहार संघटनेचे खासदार आमदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधव काही वर्षांपासून पाणी भाम, दारणा, वाकी खापरी धरणातून परवानगी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. पण वारंवार पाठपुरावा करूनही शेतकरी बांधवांची निराशा होत आहे. पाणी परवानगी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधीच बेरोजगारी वाढत असल्याने शेतकरी कुटुंबे हक्काच्या पाण्यासाठी लढत आहेत ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना पाणी परवानग्या द्याव्यात अशी मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे करण्यात आली. प्रहार संघटना आणि शेतकरी बांधव यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.

शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पाणी परवानगी उपलब्ध करून द्या अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देतेप्रसंगी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सोपान परदेशी, शेतकरी चंदर ठाकरे, राजु ठाकरे, बाळासाहेब धुमाळ, दतु कापसे, भगवान गणेशकर, उत्तम शिंदे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, मच्छिंद्र शेलार, विजयशिंग परदेशी, नामदेव कोकणे, निवृती कातोरे, तुकाराम शेलार आदी शेतकरी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!