विवाहितेवर बलात्कार : नाशिकच्या दिंडोरीरोडचा व्यक्ती गजाआड ; न्यायालयाकडून संशयिताला मिळाली ४ दिवसाची कोठडी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील विनोद देसले यांचे व्हिन्टेज व्हॅली नावाच्या बिल्डिंगच्या साइटवर पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या २५ वर्षाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दिंडोरीरोड भागातील व्यक्तीवर इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेमंत नागेश शिरोरे, वय ४६ असे त्याचे नाव असून तो अक्षर व्हिला, रो हाऊस नंबर ९, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक येथे राहतो. ह्या संशयित आरोपीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २९ जुलैला रात्री ९ वाजेच्या सुमारास हेमंत नागेश शिरोरे हा २५ वर्षीय फिर्यादी महिला राहात असलेल्या पत्र्याच्या शेडमधील घरात आला. यावेळी मला जे पाहिजे ते करून दे नाहीतर मी तुझ्या मुलाला मारून टाकीन असा दम देऊन फिर्यादी महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबत पिडीत महिला फिर्यादीने इगतपुरी पोलीस ठाण्यात समक्ष उपस्थित होऊन फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पीडित फिर्यादी महिलेने तिचे पती बाहेरून आल्यानंतर त्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानुसार तिच्या पती समवेत आज इगतपुरी पोलीस स्टेशनला तिने फिर्याद दिली. त्यानुसार  गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीला पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे आदींसह सहकारी पोलीस अधिक तपास करीत आहेत.