इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
नाभिक बांधव, शेतकरी, आदिवासी, पीडित, न्यायासाठी वंचित असलेल्या समाजाच्या व्यथा सोडविण्यासाठी नेहमीच नाभिक समाजाची शान नाभिक रत्न श्री. भास्कर सोनवणे तत्पर असतात. त्यांनी इगतपुरीनामा या ऑनलाइन पोर्टलची निर्मिती केली आहे. संपादक भास्कर सोनवणे यांनी गोरगरिबांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ऑनलाइन पोर्टलची केलेली निर्मिती कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार नाभिक समाज बांधवांनी काढले. या माध्यमातून समस्त नाभिक समाज व सलून अससिएशनच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, कायदेशीर सल्लागार अँड सुनील कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती आंबेकर जिल्हा संघटक अशोकराव सूर्यवंशी (गोंदे दुमाला ) इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र कोरडे, तालुका उपाध्यक्ष गणेश रायकर, सचिव किरण कडवे, वैभव कोरडे, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, अनिल कोरडे, जगन सोनवणे, रवी सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, जगन कोरडे, श्रीराम सोनवणे, सुरेश शेणे, संतोष ( पिंटू ) आंबेकर आदी समाज बांधव उपस्थित होते. भास्कर सोनवणे यांनी सेवेचा वसा कायम ठेवणार असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.


Comments