
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील भूषण गणेश भागडे वय २३ हा १५ जानेवारीपासून सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बेपत्ता झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या मजुरी कामाला जातो असे सांगून भूषण घरी आला नाही म्हणून त्याचे वडील गणेश पांडुरंग भागडे यांनी बेपत्ता झाल्याची खबर इगतपुरीच्या पोलीस ठाण्यात दिली आहे. रंग गोरा, उंची पाच फूट सहा इंच, डोक्याचे केस वाढलेले, चेहरा उभट, डोळे थोडे घारे, डाव्या हाताच्या कोपरावर काळ्या रंगाचे व्रण, चेहऱ्यावर तीळ असून वरील वर्णनाचा युवक कुणाला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत माहिती समजल्यास इगतपुरी पोलीस ठाणे, नजीकचे पोलीस ठाणे अथवा मोबाईल क्रांक 7972268578, 7972269562, 8097655575 ह्यावर संपर्क साधावा.