रचना : सौ. माधुरी शेवाळे पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे
ता. इगतपुरी जि. नाशिक
संवाद : 7588493260
स्वागत आषाढी । एकादशी भारी
निघाली सवारी । पंढरीला ।।१।।
गळ्यात मृदुंग । हातात चिपळी
वाजवीत टाळी । वारकरी ।।२।।
विठ्ठल विठ्ठल । मुखात भजन ।
तल्लीन होऊन । नाचतीया ।३।।
विसावा घेऊन । करती कीर्तन
सारे भक्तगण । कालव्याचे ।।४।।
पंढरीचा राजा । चंद्रभागे तिरी
स्नान वारकरी । करतीया ।।५।।
विटेवरी उभा । सावळा विठुराय
सोबत रखुमाय । पांडुरंगा ।।६।।
धन्य होई प्रजा। दर्शन कळसा
मंदिरी वळसा । मारतीया ।।७।।
पालखी सोहळा । नामाचा गजर
पंढरपूर फार । गजबजे ।।८।।।
दाही दिशातून । निघत पालखी
होतात ओळखी । शिवालयी ।।९।।
पंढरीची वारी । नयनी साठून
मिळे समाधान । माधुरीला ।।१०।।