पोलीस पाटील संघ शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांसोबत भेट : विविध मागण्यांबाबत झाली चर्चा

 कैलास पाटील फोकणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने सातत्याने शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. नाशिक जिल्हा संघाच्या वतीने साकडे घातल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्यासोबत पोलीस पाटील संघाच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली.

यावेळी राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस पाटलांचे मानधन १५ हजार करावे, कलम ३५३ नुसार कारवाई, कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पाटलांना ५० लाखाचा विमा यांसह अनेक मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी पुणे जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने 13 लाख 32 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळभोर, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव, राज्य संघटक बळवंतराव काळे, राज्य संघटक नवनाथ धुमाळ, नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे, राज्य सदस्य हनुमंत हंडाळ, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अरुण घोडके, संपत जाधव, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अशोक सांगळे, रवींद्र जाधव पाटील, रायगड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिनेश पाटील खोपोली, राज्य सदस्य निळकंठ थोरात, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर, मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव शितोळे, दिंडोरी तालुकाध्यक्ष सोमनाथ मुळाणे, महिला आघाडी अध्यक्ष पुणे तृप्ती मांडेकर, कार्याध्यक्ष रोहिणी हांडे, उपाध्यक्षा मोनिका कचरे, पोलीस पाटील रविना शेडगे, दौंड तालुका कार्याध्यक्ष अविनाश शेडगे, पोलीस पाटील अरुण तुंगार इत्यादी सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी कोरोनाच्या महामारीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांनी पोलीस पाटील संघाचे व पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचे मनापासून आभार मानले. पोलिस पाटलांच्या मागण्या संदर्भात लवकरच गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याकडे बैठक लावण्यात येईल असे अजित दादा पवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे पोलीस पाटील संघ व उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्री यांची भेट ही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यामुळे झाली. पोलीस पाटलांच्या समस्यांबाबत ते नेहमीच मदत करत असतात. नाशिक जिल्हा संघाच्या वतीने झिरवाळ साहेबांचे आभार.
- चिंतामण पाटील मोरे, जिल्हाध्यक्ष नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!