एसएमबीटी अस्थीव्यंगोपचार विभागातर्फे बेलगाव कुऱ्हे येथे शनिवारी शिबिर : सर्वांनी लाभ घेण्याचे एसएमबीटीचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या एसएमबीटी महाविद्यालयातर्फे बेलगाव कुऱ्हे येथे अस्थिव्यंग तपासणी आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि. १७ जुलैला सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिरात अस्थिव्यंग संदर्भातील सर्व आजार, त्यावरील उपचारांची माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि घ्यावयाची काळजी ह्यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वांच्या उपयुक्त असलेल्या ह्या महत्वपूर्ण शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एसएमबीटी महाविद्यालयाच्या अस्थीव्यंगोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय जाधव यांनी केले आहे.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी हाडांमध्ये अनेक चांगले वाईट बदल घडून अस्थिव्यंग वाढत आहे. हाडांच्या समस्यांमुळे अनेकांना विविध आजार आणि वेदनांना सामोरे जावे लागते आहे. यासह जन्मत: आणि अपघातामुळेही हाडांच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अस्थिव्यंग संदर्भात उपचार आणि मार्गदर्शन तातडीने मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ह्या शिबिरात बेलगाव कुऱ्हेच्या सरपंच शुभांगी गुळवे, इगतपुरीनामा न्यूज पोर्टलचे संपादक जेष्ठ पत्रकार भास्कर सोनवणे आणि एसएमबीटी महाविद्यालयाचे अस्थीव्यंगोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय जाधव मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी दि. १७ ला हे महत्वपूर्ण शिबिर होणार असून नागरिकांनी ह्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एसएमबीटी महाविद्यालयाच्या अस्थीव्यंगोपचार विभागाने केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!