इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर व्हीटीसी फाट्यावर आज सकाळी एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. ह्या अपघातात आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. ही बस नाशिकहून कसारा येथे जात होती. बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. ह्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ह्या घटनेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय देवराम सदावर्ते वय ५१ रा. घोटी ग्रामीण रुग्णालय, बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाणे वय ४५ रा. पाथर्डी फाटा, तेजस निवृत्ती पगार वय ४२ रा. नासिक, मोहन रामराव वाघमारे वय ४४ रा. शिवाजीनगर सातपूर, कुंदन वसंतराव पाटील वय ३१, प्रतिमा दिघे रा. नासिक आणि ट्रकड्रायव्हर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्गावरील वाढते खड्डे आणि सुरु असलेले संथ काम यामुळे अपघात वाढत आहेत. व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करावी.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group