इगतपुरीनामा न्यूज दि. ११ : सोशल नेटवर्कींग फोरमच्या पुढाकारातून आणि अॅस्ट्राॅल फाऊंडेशनच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिरापाली येथे वाचनालयाचे ऊद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने संपन्न झाले.
चिरापाली गावातील तरुण मोठ्या प्रमाणावर पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलिस विभागाच्या भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांच्या निवडीसाठी पंचक्रोशीत चिरापाली हे गाव प्रसिद्ध आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅस्ट्राॅल फाऊंडेशनचे जय भाई, अनिकेत धुरी, विस्तार अधिकारी राज आहेर, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, रामदास शिंदे, संदिप बत्तासे, दिलीप चौधरी,आदर्श शिक्षक संजय गवळी व केशव गावित सरपंच मोहन कनोजे, पोलीस पाटील कालिदास कनोजे, दादू कनोजे, मुंबई पोलीस दलातील जनार्दन लहारे,अमृत कनोजे, पांडुरंग गावित, अमृत धनगर, अरुण भोये, केशव राठोड, संदीप डगळे, अरुण भोये, पोपट धनगर, मोहन मौले, प्रकाश कनोजे, कुमावत कनोजे, माधव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
■ “सोशल नेटवर्किंग फोरमच्या या वाचनालयामुळे आता पोलीस पदासाठीच नव्हे तर एमपीएससी परीक्षेतसुद्धा यश मिळवण्याचा निश्चय या गावच्या तरूणांनी यावेळी बोलून दाखवला आहे. फोरमच्या प्रयत्नांना यश येतांना पाहून आनंद वाटतो.”
- प्रमोद गायकवाड
अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम