१० मुळे लागले कोरोनामुक्तीला ग्रहण

इगतपुरीनामा न्युज, दि. ४

इगतपुरी तालुक्याची कोविड रुग्णांची संख्या सुमारे २ आठवड्यांपासून १० वरच स्थिर असल्याने कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर असलेला तालुका अजूनही प्रत्यक्षात कोरोना मुक्तीपासून लांब असल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात १ नव्या रुग्णाची भर पडली असून १ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. रुग्णसंख्या वाढत नसली तरीही १० पेक्षा कमीही होत नसल्याने कोरोना मुक्तीची वाट या “दहा”ने अडवून ठेवली आहे. त्यामुळे दृष्टिपथात असलेली कोरोनामुक्तीची अपेक्षा या १० मुळे बिकट झाली असून १० च्या तावडीतून सुटून लवकरच तालुका कोरोनामुक्त व्हावा अशी अपेक्षा तालुकावासिय बाळगून आहेत.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!