काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इगतपुरी तालुक्यातर्फे सत्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
काँग्रेस पक्ष सर्वसामान्य व्यक्तीचा पक्ष आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांवर पक्ष वाढवण्यासाठी जबाबदारी देत योग्यतेप्रमाणे प्रत्येकास न्याय देण्यास कटिबद्ध आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
इगतपुरी तालुक्याच्या वतीने आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पटोले यांचा मुंबई येथे सत्कार केला. या शिष्टमंडळात जेष्ठ नेते संपतराव सकाळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, असंघटित कामगार प्रदेश उपाध्यक्षा संगिता मोरे, जिल्हा सरचिटणीस शिवाजी कासव, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे, इगतपुरी महिलाध्यक्षा सविता पंडित, जेष्ठ नेते देवराम नाठे, युवक काँग्रेसचे किरण पागेरे, मधुकर गायकर, विनायक लाड, रघुनाथ खातळे, सागर मुठाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

■ नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करतांना तालुक्यासह जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती विशद केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. जेणेकरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्ष कार्यास वाव देता येईल. विशेषतः युवकांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
भास्कर गुंजाळ, सचिव – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

इंदिरा काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार करतांना इगतपुरी तालुक्याचे शिष्टमंड