आदिवासी कॉंग्रेसच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजू काळू गांगड : आदिवासी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – अखिल भारतीय आदिवासी कॉंग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील राजू काळू गांगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणूनही राजू गांगड काम पाहतात. आदिवासी भागात त्यांनी नागरिकांसाठी सातत्याने चांगले काम उभे केलेले आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांचे इगतपुरी तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

कॉंग्रेसची विचारधारा व गांधी घराण्याचे नेतृत्व हेच आदिवासींना न्याय देवू शकतात. म्हणुन प्रत्येक आदिवासीला कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेशी जोडण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये आदिवासींना जोडण्याचे प्रयत्न करावे. कॉंग्रेस पक्ष मजबुत झाल्यास आदिवासी सुरक्षित राहतील असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी तयार करावी असे श्री. गांगड यांना सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी राजू गांगड यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!